राजेश चषक खुल्या व मुलांच्या विविध वयोगटातील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात रविवारी

 राजेश चषक खुल्या व मुलांच्या विविध वयोगटातील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात रविवारी



 कोल्हापूर 18  सिटी न्यूज नेटवर्क 


कोल्हापूर उत्तर चे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त च्या शिवसेना प्रभाग क्रमांक दोन च्या वतीने राजेश चषक खुल्या व विविध वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.

   चेस असोसिएशन कोल्हापूर (अधिकृत जिल्हा संघटना) च्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ, जाधववाडी, शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर येथे रविवार दिनांक २२ रोजी होत आहेत.



 या स्पर्धा खुल्या व ७, ९, ११, १३ व १६ वर्षाखालील मुले/मुली अशा एकूण सहा गटात स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.

 या स्पर्धेसाठी सर्व गटात मिळून एकूण रोख ५१,०००/- रुपये व चषक किंवा मेडल्स या स्वरूपात एकूण १७१ बक्षीस ठेवले आहेत.खुल्या गटात एकूण रोख अकरा हजार रुपये व चषक किंवा मेडल अशी एकूण ३१ बक्षिसे पुढील प्रमाणे १) ३०००/- व चषक २) २०००/- व चषक ३) १०००/- व चषक ४) ७००/- व मेडल ५) ६००/- व मेडल ६) ५००/- व मेडल क्र. ७ ते १० प्रत्येकी ३००/- व मेडल क्र. ११ ते २५ प्रत्येकी मेडल 

 उत्तेजनार्थ उत्कृष्ट जेष्ठ बुद्धिबळपटूंना व उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटूंना अनुक्रमे १) ५००/- व मेडल २)३००/- व मेडल

७, ९, ११, १३ व १६ वर्षाखालील मुला मुलींच्या  प्रत्येक गटासाठी रोख आठ हजार रुपये चषक किंवा मेडल अशी एकूण २८ बक्षीस खालील प्रमाणे आहेत.

१) २०००/- व चषक २) १५००/- व चषक ३)१०००/- व चषक ४) ७००/- व मेडल ५) ५००/- व मेडल क्र. ६) ते ८) प्रत्येकी ३००/-व मेडल क्र. ९) व १०) प्रत्येकी २००/- व चषक क्र. ११ ते २५ प्रत्येकी मेडल

 उत्तेजनार्थ उत्कृष्ट मुलींना १) ५००/- व मेडल २) ३००/- व मेडल 3) २००/-व मेडल

 स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी  २५० रुपये प्रवेश फी ठेवली आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा.

१) आरती मोदी :- 8149740405

२) मनिष मारुलकर :- 9922965173

३) रोहित पोळ :- 9657333926

४) उत्कर्ष लोमटे :- 9923058149

५) प्रितम घोडके :- 8208650388

 रविवारी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर दहा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल असे शिवसेना प्रभाग क्रमांक दोन च्या वतीने शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनय वाणी व शिवसेना शहर उपप्रमुख बंडा माने यांनी पत्रकाद्वारे वरील माहिती दिली आहे.

Comments