इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण

सिटी न्यूज़
                                     चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण 
इस्रो चे  अध्यक्ष के. सिवन


 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज ऐतिहासिक कामगिरी करत ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण केले. आज, सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने अवकाशात झेप घेतली.
 विशेष म्हणजे हे यान अधिक वेगाने जात ठरलेल्या वेळेत म्हणजे ६ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. 
काही वेळातच इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर केले.
 चंद्रावरील पाणी, खडक, खनिज संपत्ती आदी विविध बाबींचा खजिना मानव जातीसाठी ‘चांद्रयान-२’ मोहिमेतून उपलब्ध होणार आहे.
 या यानास चंद्रावर पोहोचण्यासाठी साधारणत: ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या यानाचे वजन ३,८५० किलोग्रॅम आहे. या मोहिमेसाठी ९७८ कोटी खर्च आला आहे.
 चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यान उतरवून ‘इस्रो’ विक्रम करणार आहे. चंद्रावर यान उतरविल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे.
 १५ जुलै रोजी ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे याचे प्रक्षेपण पुढे ढकलले होते. आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘चांद्रयान-२’ हे चंद्रावर अधिक वेगाने जाणार आहे.
 यापूर्वी ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.

Comments