कोल्हापूर • प्रतिनिधी :
पोलिस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सातत्याच्या सामूहिक प्रयत्नामुळे महिलांकडून अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी नोंदणीचे प्रमाण वाढत चालले आहे . या महिलांसह बालसोशितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी सध्या ५५० असणाऱ्या महिला व बालन्यायालयांची संख्या आगामी तीन महिन्यात दुप्पट होऊन ती एक हजारपर्यंत जाईल , अशी महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया राहटकर यांनी दिली . यावेळी त्यांच्या समावेत सदस्या रोहिणी नायडू , जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ . अभिनव देशमुख , पोलिस उपाधिक्षक प्रेरणा कट्टी आदी उपस्थित होते . येथील बालकल्याण संकुलमध्ये शनिवारी दिवसभर महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातंर्गत समोपचारासाठी २४ कुटुंबिय आले होते . यापैकी २२ प्रकरणात आजच तडजोड निघून नवरा - बायको एकत्र राहण्यासाठी तयार झाले . हे सामूहिक यश अभिनंदनीय आहे , अशी माहिती त्यांनी यावेळी दिली . बालसोशनातर्गत पोर्नोग्राफी विरोधात केंद्र शासनाने अत्यंत कडक कायदे केले असून त्यामध्ये फाशीपर्यंतची तरतूद आहे . यामुळे हे शोसन कमी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . महिला अत्याचार होण्यासंदर्भात पोलिसांनी दोन महिन्यात चार्जशीट दाखल करणे आणि न्यायालयाने दोन महिन्यात निकाल देणे तसेच या निकाला विरोधात अपिल केल्यास त्यावरही दोन महिन्यात निकाल देणे अपेक्षित आहे . या संदर्भाने कोल्हापूर जिल्हयात कामाने गती घेतली आहे , अशी माहिती त्यांनी दिली . डिजीटल साक्षरता अभियान महिला अधिक सक्षम व्हाव्यात आणि त्यांनी माहिती तंत्रज्ञानासह सोशल मिडीयाचा अधिक समर्पकपणे वापर करावा यासाठी महिला आयोग आग्रहाने कार्यरत असून गावतालुका पातळीपर्यंत यासाठी डिजीटल साक्षरता अभियान महिलांसाठी राबविण्यात येत आहे . राज्यात एक । हजार महिलांपर्यंत पोहचण्याचे नियोजन असल्याचे तसेच ऑनलाईन महिला अत्याचार प्रबोधन कोर्सलाही मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे राहटकर यांनी यावेळी सांगितले . शनिवारी तीन पथकाद्वारे आलेल्या समोपचाराच्या खटल्यात समुपोदेशन करण्यात आले . यामध्ये पोलिस उपाधिक्षक पदमा पाटील , जिल्हाधिकारी कार्यालय सदस्था संगीता नेलीकर यांच्यासह बी . जी . काटकर , आनंदा शिंदे , संजय चौगुले , अँड . शिल्पा सुतार , मंगला नियोगी , गीता हसुरकर यांच्यासह सदस्य सहभागी होते
Comments
Post a Comment