जिओ प्लॅटफॉर्मच्या दोन कंपन्यांची इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये तांत्रिक क्षमता प्रदर्शित

 जिओ प्लॅटफॉर्मच्या दोन कंपन्यांची इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये  तांत्रिक क्षमता प्रदर्शित




नवी दिल्ली, 27 सिटी न्यूज नेटवर्क

 जिओ प्लॅटफॉर्मच्या दोन उपकंपन्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये त्यांचे तांत्रिक कौशल्य दाखवले. बेंगळुरू-आधारित  एस्टेरिया ऐरोस्पेस लिमिटेड  ही एक पूर्ण-स्टॅक ड्रोन तंत्रज्ञान कंपनी आहे जी सॉफ्टवेअर तसेच ड्रोन हार्डवेअरवर काम करते. दुसरीकडे, सांख्यसूत्र लॅब, जिओ प्लॅटफॉर्मशी संबंधित आणखी एक कंपनी असून मल्टीफिजिक्स, एरोडायनॅमिक्स सिम्युलेशन सॉफ्टवेअर आणि सखोल तंत्रज्ञानामध्ये तज्ञ आहे. 27, 28 मे रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये दोन्ही कंपन्या सहभागी होत आहेत. महोत्सवाचे आयोजन नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केले आहे.


महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टेरिया स्टॉलला भेट दिली, त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती घेतली आणि रिमोट कंट्रोलच्या मदतीने ड्रोन उडवतानाही पाहिले. ड्रोन उद्योगाबाबतचे त्यांचे व्हिजन शेअर करताना पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की, दशकाच्या अखेरीस भारत हे जगाचे ड्रोन हब बनेल. यासाठी भारत सरकार ड्रोनशी संबंधित उद्योगाला पूर्ण सहकार्य करेल.


एस्तेरिया स्टॉलला पंतप्रधानांच्या भेटीमुळे उत्साहित झालेले निहार वर्तक- कंपनीचे सह-संस्थापक म्हणाले, “हा कार्यक्रम आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढीतील ड्रोन आणि स्कायडेक प्रदर्शित करण्याची एक उत्तम संधी आहे. आम्ही दहा वर्षांपूर्वी भारताच्या ड्रोन स्पेसमध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हापासून आम्ही या तंत्रज्ञानाची मागणी आणि वापरामध्ये तीव्र वाढ पाहिली आहे.


“जेव्हा आपण संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाबद्दल बोलतो, तेव्हा आम्ही अनेकदा विविध हार्डवेअर घटक तयार करण्याच्या देशाच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. तथापि, स्वदेशी डिझाइन साधनांशिवाय आत्मनिर्भरता येऊ शकत नाही. सांख्यसूत्रात आम्ही भारत आणि जगासाठी सखोल तंत्रज्ञान विकसित करत आहोत.” डॉ सुनील शेर्लेकर, सीईओ, सांख्य सूत्र लॅब यांनी एका निवेदनात म्हटले आहे.


पीएम मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात तंत्रज्ञान हा समस्येचा भाग मानला जात होता, त्याला गरीब विरोधी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे 2014 पूर्वीच्या कारभारात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते. सर्वात जास्त नुकसान देशातील गरिबांचे, वंचितांचे, मध्यमवर्गाचे झाले. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी धान्य, रॉकेल, साखरेसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असे. आपल्या वाट्याचा माल मिळेल की नाही, अशी भीती लोकांना वाटत होती. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ही भीती दूर केली आहे.

Comments