शाहिरीच्या सादरीकरणात नवीन पर्व सुरु
कोल्हापूर 25 सिटी न्यूज नेटवर्क
समाज व संस्कृतीप्रमाणे कलाक्षेत्रातही काळानुरूप बदल घडत असतात. असे बदल प्रयोगशील कलावंतच घडवत असतात. शाहिरीच्या लोकपरंपरेतही आता नवीन काळानुरूप डिजीटल पर्व सुरू करण्याची सुरुवात शाहिरीसाठी मान्यवर विद्यपीठाकडून 'डी लिट्' चा सन्मान लाभलेले शाहीर डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी करून दाखवली आहे.
राऊत म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व! चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर अशी ओळ असणान्या राऊत यांनी शाहीरतिलक पिराजाराव सरनाईक यांच्या निधनानंतर लेखणी व उफ हातात घेत शाहिरीच्या क्षेत्रातदेखील आपला अमीट ठसा उमटवला. त्यांनी केलेल्या रचनांना कर्नाटक शासनान पाठ्यपुस्तकात स्थान दिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहिरी परंपरेचे सर्व साजशृंगारासह सादरीकरण करण्याचा मानदेखील राऊत यांचाच. गेल्या २५ वर्षांमध्ये नवनव्या शाहिरी रचना करत लोकवाङ्मयात दर्जेदार भर घातली.
रचनांमध्ये वेगवेगळी वृत्ते, छंद, प्रास अनुप्रास व शैली उपयोगात आणणान्या शाहीर राऊत यांनी गिटार, शंख,बासरी यासारख्या वाद्यांचा पोवाड्याच्या सादरीकरणातही उपयोग करून पारंपारिक, सांगितिक मुल्यांमध्ये आमूलाग्रद बदल घडविण्याचे धाडस दाखविले. शाहिर राऊत यांचे कलाक्षेत्रातील हे आगळे योगदान लक्षात घेऊन मुंबईतील
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने त्यांना 'डी लिट्' प्रदान करून त्यांचा सन्मान केला.कोरोनाच्या महामारीने जगाला ग्रासल्यांनतर लोकांच्या मोठ्या संख्येने एकत्र येण्यावर निर्बंध आले आणि लोककलाकारांची कुचंबणा सुरू झाली. कमीतकमी लोकांच्या साथीने मर्यादित लोकसमुहासमोर बहारदार कार्यक्रम
सादर करायचा तर तो कसा करता येईल? यावर विचारमंथन सुरू झाले. या विचारमंथनातूनच शाहीर राऊत यांनाअभिनव कल्पना सुचली. रोलँडसारख्या तीन ऑक्टोपॅडचा वापर करत तीन लोक किंवा एकटा शाहीरदेखील वीसलोकांचा सांगितिक संच सादर करतो. तसा शाहिरीचा कार्यक्रम सादर करू शकेल असे तंत्र शाहीर राऊत यांनी विकसित केले. यातून शाहिरी परंपरेत आता डिजीटल शाहिरी असे शाहिरीच्या सादरीकरणाचे नवे पर्व सुरू होत आहे.
साज तोच, बाज तोच, शाहिरीची तडफ तीच, पण सादरीकरण 'डिजिटल तंत्र' वापरून हे नव्या शाहिरी परंपरचे वैशिष्ट्य असणार आहे. नव्या तंत्रामुळे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक विषयांवरील शाहिरी तसेच ,भजन, शाळा, महाविद्यालये, हौसिंग सोसायट्यांचे हॉल याबरोबरच वाढदिवस, लग्नसोहळे अशा निमिताने छोट्या जागेत होणाऱ्या मैफिलीप्रमाणे सादर केली जाऊ शकणार आहे. राजर्षी शाहुंनी कोल्हापूर 'कलापूर' म्हणून घडवताना शाहिरी परंपरेला जे अनमोल प्रोत्साहन दिले होते त्या पार्श्वभूमिवर राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षात
त्यांना आदरांजली म्हणून राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने शाहिरीतील या नव्या तंत्राबदलाची घोषणा करण्यात येत आहे अशी माहिती आज शिवशाहीर राजू राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Comments
Post a Comment