विधानपरिषद निवडणुकीमध्ये उल्लेखनीय यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

 विधानपरिषद निवडणुकीमध्ये उल्लेखनीय यशाबद्दल 

भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव




कोल्हापूर दि.२१ सिटी न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये उल्लेखनीय यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव करण्यात आला. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हालगीच्या ठेक्यावर नृत्य करत आपला आनंद साजरा केला. यावेळी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आता कस वाटतय गार गार वाटतय, एकच वादा चंद्रकांतदादा, हमारा नेता कैसा हो देवेंद्र फडणवीस जैसा हो अशा घोषणांनी छ.शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. 

देवेंद्रजी हे एकटे नसून त्यांच्या मागे भाजपा सक्षम नेत्यांची भक्कम टीम आहे. गेली ३ वर्षे शिवसेनेने जी अनैसर्गिक युती केली होती याची खंत या राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीमध्ये दिसून आल्याचे मत जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी व्यक्त केले. 

सामान्य माणसांच्या मनातील मुख्यमंत्री अजूनही देवेंद्रजी आहेत लवकरच ते मुख्यमंत्री होतील असा विश्वास प्र.का.सदस्य महेश जाधव यांनी व्यक्त केला. 

सरचिटणीस विजय जाधव यांनी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, प्रवक्ता अजित ठाणेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. 



याप्रसंगी गणेश देसाई, अजित ठाणेकर, सुनीलसिंह चव्हाण, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, संदीप कुंभार, प्रसाद मुजुमदार, प्रीतम यादव,  विवेक कुलकर्णी, भरत काळे, अशोक लोहार, प्रविणचंद्र शिंदे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, सुजाता पाटील, समयश्री आययर, स्वाती कदम,रजनी भुर्के, अशोक लोहार, सुशांत पाटील, राजू पोळ, ओंकार खराडे, अरविंद वडगांवकर, प्रकाश घाटगे, कोमल देसाई, मामा कोळवणकर, रमेश दिवेकर, सचिन जाधव, सचिन आवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 


Comments