'आप'च्या शहर संघटकपदी संजय साळोखे यांची निवड

 'आप'च्या शहर संघटकपदी संजय साळोखे यांची निवड



कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क

भूविकास बँक कर्मचारी युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवाजी पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते संजय साळोखे यांची आम आदमी पार्टीच्या शहर संघटकपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई व जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले.


पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना साळोखे यांनी पक्षाच्या दिल्ली व पंजाब येथील वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व शेतीच्या क्षेत्रातील लोकाभिमुख कार्यामुळे आपण प्रभावित झालो असून असेच कार्य कोल्हापुरात देखील व्हावे यासाठी पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत 'आप'चा महापौर आणण्यासाठी शिवाजी पेठेचे योगदान महत्वाचे आहे, साळोखे यांच्या प्रवेशामुळे त्याला बळ मिळणार असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, ऍड. सी. व्ही पाटील, पारस ओसवाल, डॉ. कुमाजी पाटील, किशोर खाडे यांची मनोगते झाली.


प्रास्ताविक अभिजीत कांबळे, सूत्रसंचालन मोईन मोकाशी यांनी केले.


यावेळी दूषयंत माने, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, आनंदराव चौगुले, संग्राम पाटील, अश्विनी चव्हाण, संगीता साळोखे, शोभा बोंद्रे, शोभा पाटील, शशांक लोखंडे, राजेश खांडके, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, रवींद्र ससे, विलास पंदारे आदी उपस्थित होते.

Comments