पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भव्य अशा "भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दीचा महापूर
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भव्य अशा "भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दीचा महापूर
प्रदर्शनात दोन दिवसात झाली ५ कोटीच्या आसपास उलाढाल
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अलोट गर्दी ही मेरी वेदर मैदानावर केली होती.प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरत आहे.
याचबरोबर गाय आणि बैल या दोन्हीचा संगम असणारी खिलार जातीचा बैजा नावाचा पाच वर्षाचा पांढरा बैल व हरियाणा जातीची रेडी जी ३३ महिन्याची आहे मुऱ्हा जातीची १९ लिटर दूध देणारी म्हैस रावण नावाचा लाल कंधारी वळू जो नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील आहे ज्याने महाराष्ट्र चॅम्पियन दोन वेळा पटकावला आहे. तर अन्य स्पर्धांमध्ये त्यांने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. सर्जा नावाचा कपिला गीर आठ वर्षे सहा महिन्याचा दोन दाती बैल आहे जो कोपर्डी तालुका आजरा येथील आहे.८ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे उंदीर, व ७० व ५० किलो वजनाचा उस्मानाबादी बकरा, कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर, पपेट,पांढरे उंदीर ससे बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.
शिवाय ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी हेही आकर्षण ठरत आहे.प्रदर्शनात दोन दिवसात झाली ५ कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
यावर्षीचे प्रदर्शनाचे १४ वर्ष असून चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर मोठी गर्दी केली आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षनिमित्त तृणधान्य
येथील मेरी वेदर मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केलेल्या मिलेटचे (तृणधान्य) याचे स्वतंत्र दालन उभे कटण्यात आले आहे.ज्यात प्रथम मिलेटिइयरमध्ये ४० स्टॉल आहेत. जे.आय मानांकन असणारे पदार्थ व लाल कांदा, आजरा घनसाळ तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम, हळद आदी पहायला मिळत आहे.केळीच्या बुध्दांपासून पदार्थ बनविणारी गुजरात मधील कंपनी रेशीम कोष याची माहितीही पहावयास मिळत आहे.
हायड्रोफोनिक चारा असणार आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत.हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.व याची खरेदी शेतकरी वर्ग करत आहे.
मोफत झुणका भाकरीची सोय
भागीरथी महिला संस्थेमार्फत येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात आले विक्रम नगर येथील महालक्ष्मी महिला बचत गट यांनी ५००० भाकरी व झुणका वाटप करण्यात आल्या रोज प्रत्येक बचत गटांना संधी सौ अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.यावेळी मंगल ताई महाडिक साधना महाडिक मंगलताई महाडिक इंद्रजित जाधव प्रमोद हुदले आदी उपस्थित होते.
आज झालेल्या व्याख्यानांची माहिती
आज २७ जानेवारीस कृषी विभागाच्या कृषी विकासात्मक शासकीय योजना या विषयावर महाराष्ट्र शासन पशु विभागाचे कृषी अधिकारी श्री. सतीश वर्मा यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड,गांडूळ व खत निर्मिती आणि शेततळे योजना याविषयीची माहिती दिली. दुधाळ जनावरांच्या आरोग्य व वासरू संगोपन या विषयावर बोलताना डॉ.संजय आस्वले यांनी जनावरांचा आहार फशुखाद्य प्रजनन व वासरू संगोपन याविषयी विस्तृत माहिती दिली. दुधाळ जनावरांच्या मध्ये वैरणीचे महत्त्व पशुखाद्याचे प्रमाण व महत्त्व दोन वेतातील अंतर कसे कमी करावे व जास्तीत जास्त जनावराकडून वेते घेणे व वासरांचे संगोपन करून भावी कालवड यांचे रूपांतर जातीवंत म्हैस यामध्ये करणे याविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी कागल अनिकेत माने यांनी महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर रोटर पावर व्हिलर यांना अनुदान वैयक्तिक शेततळे पिक विमा या विषयी मार्गदर्शन केले तर प्रमोद शिंदे यांनी ठिबक सिंचन आणि पीक स्पर्धा याविषयी मार्गदर्शन करून शेतकरी अपघात विमा योजना, ठिबक सिंचन, माती परीक्षण करून दर तीन वर्षांनी व मातीची व पाण्याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी सर्व वक्त्यांचे स्वागत प्रा.डॉ. जे.पी.पाटील यांनी केले.
२८ व २९ रोजी होणारी व्याख्याने
२८ जानेवारी रोजीदुधाळ जनावरांसाठी मुरघास फायदेशीर या विषयावर चितळे डेरी फार्म भिलवडीचे चंद्रशेखर कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. पौष्टिक तृणधान्य पिके आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान या विषयावर विभागीय संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूरचे डॉ. योगेश बन नाचणी पैदासकार हे मार्गदर्शन करणार आहेत. तर भाजीपाला सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर भाजीपाला पैदासकार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ.भरत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.निसर्गोपचार केंद्र प्रा.लि. चे स्वागत तोडकर हेही मार्गदर्शन करणार आहेत आणि २९ जानेवारी रोजी जमीन व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्त्व या विषयावर डॉ. जे. पी.पाटील प्राध्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ता. फलटण जि. सातारा डॉ. भारत रासकर व सहकारी ऊस वाण व आधुनिक लागवड पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सहभागी कंपन्या व त्यांची उत्पादने
या प्रदर्शनामध्ये ऑरगॅनिक बायो फर्टीलायझर मध्ये युगांतर अँग्रो, जीएनपी अँग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, यु.एस. के. अँग्रो सायन्सेस, वनिता अँग्रो, डॉ. बावस्कर टेक्नॉलॉजी,पॉवर टिलर आणि रोटावेटर मध्ये समृद्धी अँग्रो एजन्सी, डेक्कन फार्म इक्विपमेंट,बळीराजा ट्रॅक्टर्स अँड स्पेअर्स - किर्लोस्कर ओंकार अँग्रो एजन्सीज.पंप मध्ये बी.के.सेल्स अँड बिटाली प्रेशर पंपस सहभागी झाले आहेत.ट्रॅक्टर मध्ये सागर ऑटोमोबाईल,बळीराजा ट्रॅक्टर- किर्लोस्कर , कुबोटा ट्रॅक्टर.माथा टायर याचबरोबर
कॅटल फीड मध्ये तिरुमला ऑइल व्हीर बॅक अँनिमल हेल्थकेअर.
सोलरमध्ये सुदर्शन सौर, आनंद एजन्सीज आदी.मिल्कमध्ये चितळे डेअरी,फूड मध्ये अँपीज इंडिया लिमिटेड.याशिवाय जैविक बायोगॅस खत निर्मितीमध्ये गोवर्धन एंटरप्राईजेस आटा चक्की मध्ये बळीराजा आटा चक्की जयकिसान आटाचक्की आदी कंपन्यां व त्यांची ट्रॅकटर कृषी पंप जी. एन. पी. अँग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड टू व्हीलर बाइक किर्लोस्कर होंडा क्रॉम्प्टन ग्रीव्हज लक्ष्मी शार्प किर्लोस्कर इत्यादी नामांत कंपन्यांचे पंपसेट समृद्धी आर्मी केम सेंद्रिय खनिज सूक्ष्म द्रव्य खत, फाल्कन कंपनीचे वेगवेगळे मशिनरी पंप डेक्कन फार्म इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे पुष्पक सुपर हायड्रोलिक पलटी नांगर माटा टायर्स, अपोलो टायर्स,विभा इंटरप्राईजेस चे सोलर प्लांट ऍग्रो चे युगांतर अँग्रो चे दूध दरवाढीसाठी आणि दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मशीन, डिके ग्रुपचे समृद्धी ॲग्रो एजन्सी चे वेगवेगळे ट्रॅक्टर फोर्सची उत्पादने, बळीराजा आटाचक्की निसर्गोपचार केंद्र तोडकर संजीवनी भारतातील पॉवर विडर व पॉवर टिलर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीची एग्रीमेंट ची ट्रॅक्टरस पॉवर रायडर मशिनरी खास रोटावेटर ट्रॅक्टर पंप कंटेनर बी बियाणे अवजारे खते औषधे आदी उत्पादने पाहावयास मिळत आहेत.व याची खरेदी केली जात आहे.
प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, व धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय सेंद्रिय गूळ,हळद,मसाले,बेदाणे नाचणी,उडीद,ज्वारी,डाळी, बाजरी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.ज्याची खरेदी केली जात आहे.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने तुती बने रेशीम आळी,त्यापासून रेशीम निर्मिती व कापड यांची प्रात्यक्षिके
मांडण्यात आले आहे..पाणबोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, हेही पहावयास मिळत आहे.
प्रदर्शनात अशी आहेत जनावरे
या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात मोठा हरियाणाहून आलेला मुऱ्हा जातीचा १२ कोटी रुपयांचा बादशहा रेडा व त्याचीच बहीण ३१ लिटर दूध देणारी बिजली ना नावाची म्हैस ही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
बादशहा रेडा हा ४ वर्षाचा आहे त्याचे वजन ११०० किलो असून सुखाचारा बाजरी, मका, ड्रायफ्रूट असे एक वेळ तो खाद्य खातो त्याचा रोजचा खर्च चार ते पाच हजार रुपये आहे. सकाळी तो फिरतो दूध पिऊन झोपतो दुपारीही विश्रांती घेतो.आणखी फिरून येतो व सायंकाळी पाच वाजता तो खाद्य खाऊन विश्रांती घेतो.
बजरंगी म्हैस ही ५ वर्षांची आहे ही बादशहाचीच बहीण असून तिचा खर्चही चार ते पाच हजार रुपये आहे ती रोज ३१ लिटर दूध देते तिचे खाद्यही चारा, मका, नाचणी असे आहे. या दोघांनाही नऊ माणसे सांभाळतात त्यांची नावे कोच देवेंद्र, संदीप, लोकेश, श्रीकृष्णन, प्रदीप चौधरी अशी आहेत.या दोन्ही जनावरांचे आई-वडील अजूनही जिवंत असून वडील बजरंगी हे आठ वर्षाचे असून आई लीलावती ही सात वर्षांची आहे.बादशहा व बिजली यांना २ भाऊ व ४ बहिणी आहेत.
याचबरोबर गाय आणि बैल या दोन्हीचा संगम असणारी खिलार जातीचा बैजा नावाचा पाच वर्षाचा पांढरा बैल व हरियाणा जातीची रेडी जी ३३ महिन्याची आहे मुऱ्हा जातीची १९ लिटर दूध देणारी म्हैस रावण नावाचा लाल कंधारी वळू जो नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील आहे. ज्याने महाराष्ट्र चॅम्पियन दोन वेळा पटकावला आहे. तर अन्य स्पर्धांमध्ये त्यांने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. सर्जा नावाचा कपिला गीर आठ वर्षे सहा महिन्याचा दोन दाती बैल आहे जो कोपर्डी तालुका आजरा येथील आहे.
याबरोबरच या भीमा कृषी प्रदर्शनात कडकनाथ कोंबड्या, गायी, बैल, म्हैशी, चिनी कोंबड्या घोडे व अन्य जनावरे पहावयास मिळणार आहेत. ८ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, घोडे ५० व ७० किलो वजनाचा बकरा आकर्षण ठरत आहेत. इतर खोंड,जाफराबादी गायी,पंढरपुरी बैल,हँगस्टर जातीचे उंदीर, बदक कडकनाथ कोंबडी व चिनी कोंबडी गीज व इंडियन नर व्हाइट बँकिंग पक्षी, पहावयास मिळत आहेत.व हे सर्व प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.
प्रभास फिल्मस हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून सहप्रयोजक निसर्गोपचार केंद्र प्रा.लि. व रिलायन्स पोलिमर्स हे आहेत. तर कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे.हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे.
देश विदेशातील विविध कंपन्यांची उत्पादने,वेगवेगळी जनावरे महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार होत असलेले पदार्थ, शेतीविषयक योजनांची माहिती, वेगवेगळी बी बियाणे औषधे अवजारे यांचा समावेश असलेले भीमा कृषी प्रदर्शन अजून दोन दिवस शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे तरी याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
आज मुजरा मराठी मनाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
आज प्रदर्शनास माजी आमदार महादेवराव महाडिक,खा.धनंजय महाडिक,पृथ्वीराज महाडिक,विश्वराज महाडिक,कृष्णराज महाडिक व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक यांनी भेट दिली.उद्या शनिवारी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भीमा कृषी प्रदर्शनास भेट देणार आहेत.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : ५०० kg
२) इंद्रायणी तांदूळ : १५०० kg
३) आजरा घनसाळ : १५०० kg
४)रत्नागिरी २४ तांदूळ :- ५०० kg
५)दप्तरी तांदूळ :- २०० kg
६) सेंद्रीय हळद : ५०० kg
७) जोंधळा जिरगा तांदूळ : ५०० kg
८) नाचणी : ३००kg
Comments
Post a Comment