भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्नपहिल्या दिवशीच शेतकऱ्यांची गर्दी
कृषी क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात आघाडीवर, कोल्हापूर मध्ये पर्यटक वाढले तर कोल्हापूरचा नकाशा बदलेल - पालकमंत्री नामदार दीपक केसरकर
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धंनजय महाडिकांचे आवाहन
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
कृषी हा भारताचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर ३० टक्के लोक शहरात राहतात.व ८० टक्के लोक कृषीवर अवलंबून आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. कृषी क्षेत्राची तुलना कशाशीही करता येत नाही. जगाची अर्थव्यवस्था कोलमडली होती त्यावेळी कृषीला अधिक महत्त्व आले होते. जो देश धान्याचा पुरवठा करू शकत नाही तो देश जागतिक बाजारपेठेमध्ये टिकू शकत नाही असे सांगत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून वेगळी उत्पादने घेऊन पैसा मिळविणे काळाची गरज असल्याचे उदगार भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी काढले.कृषी क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात आघाडीवर5 असून कोल्हापूर मध्ये पर्यटक वाढले तर कोल्हापूरचा नकाशा बदलेल असा विश्वास ही यावेळी पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
येथील मेरी वेदर मैदानावर आजपासून भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या फित कापून पालकमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. यावेळी बोलताना पालकमंत्री ना. दीपक केसरकर यांनी नाशिक आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे कृषी क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत.प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य असते तसेच कृषी क्षेत्रात कोल्हापूरचे एक वेगळे स्थान आहे. कोल्हापूर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून कोल्हापूरचा आत्मा ऊस आहे या उसापासून ऑरगॅनिक गूळ साखर इथेनॉल आधी पदार्थ बनविले जातात. उसाबरोबर काजूचे महत्त्वही त्यांनी पटवून सांगितले. गाईच्या दुधाचे महत्त्व अधिक आहे. कोंबडीच्या अंडीलाही महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी गायीचे आणि कोंबड्याचा व शेळी,बकरी व्यवसाय करणे उपयुक्त व पूरक असे ठरणार आहे.व त्याचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे.हा जोडधंदा शेतकरी सुरू करू शकतो. भीमा कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे प्रदर्शन असून खा.धंनजय महाडिक यांचे कौतुक करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी जमिनीचे परीक्षण करून उत्पादन वाढविले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. शिवाय अंबाबाईचे महात्म कोल्हापुरात व भारतात मोठे आहे. कोल्हापूरच्या पर्यटनाचा विकास शाहू महाराजांची गादी व ताराराणीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. शाहू महाराजांनी या करवीर संस्थांनमध्ये राधानगरी धरण बांधले, वीज निर्मिती केली, हॉस्टेलची उभारणी केली सांगली संस्थांमधून अनेक विकास कामे कोल्हापूरकडे आणली.केवळ छत्रपतींचे नाव घेऊन चालणार नाही तर या घराण्याचा वारसा विसरून चालणार नाही त्यांचाही मानसन्मान जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. वैभवशाली कोल्हापूर निर्माण करायचे आहे.इचलकरंजी व कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दूर करायचा आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोल्हापूरचा वैभवशाली इतिहास घडवूया अशी ग्वाही ना.दीपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे.
आपल्या प्रस्ताविकपर भाषणात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी महाडिक कुटुंब पैलवान घराणे म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर हा कृषी क्षेत्रात आघाडीवर असणारा व ऊस उत्पादकामध्ये जागतिक पातळीवर नंबर वन असलेला जिल्हा आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नवनवीन उत्पादन वाढविता यावे व शेतीचे नवनवीन बदललेले तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठीच भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाचा विचार मनात आला आणि गेल्या पंधरा वर्षापासून हे प्रदर्शन भरविले जात असल्याचे सांगून या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक कंपन्यांचे स्टॉल, नवनवीन तंत्रज्ञान शेती विषयक माहिती,ड्रोन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके व याचा शेती व्यवसायाला कसा फायदा होईल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने २०० स्टॉलला या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या जातीवंत पशुपक्षी व उस्मानाबाद लातूर पासून आलेली जनावरे,गाई म्हैशी जाफराबादी बैल,हरियाणातील बादशहा नावाचा रेडा व बिजली नावाची म्हैस व अन्य जनावरे पाहण्याची संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध केली असल्याचे सांगून जवळ जवळ पाच ते सहा लाख लोक या प्रदर्शनाला चार दिवसांमध्ये भेट देऊन माहिती घेतात व आठ ते दहा कोटींच्या आसपास उलाढाल व अवजारे ट्रॅक्टर शेती विषयक साहित्याची विक्री होत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर मधील महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासाचे काम आपण हाती घेतलेले आहे. शिवाय कोल्हापूरच्या मातीतील कुस्ती व खेळ सक्षम झाला पाहिजे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे याबाबत ही आपण पुढाकार घेतलेला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्नही आपण हाती घेतला आहे. आणि तो सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात. आपण कोल्हापूरच्या विकासात लक्ष घालत आहात हे आमच्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.व चार दिवस चालणाऱ्या या भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार महादेवराव महाडिक,आमदार प्रकाश आवडे,माजी आमदार अमल महाडिक,माजी मंत्री भरमु अण्णा पाटील,निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे,जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावर,पोलीस अधीक्षक श्री.शैलेश बलकवडे,भाजप शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे,भाजप महिला अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक,भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक,देवस्थान समिती माजी अध्यक्ष महेश जाधव,माजी नगरसेवक जयंत पाटील, सुनील कदम,विशाल चोरडिया,प्रभास फिल्म्सचे सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन ताज मुल्लाणी यांनी केले तर आभार भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वजीत महाडिक यांनी आभार मानले.
प्रदर्शनाचे खास आकर्षण
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासून शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर गर्दी केली होती. या प्रदर्शनामध्ये हरियाणाहून आलेला मुऱ्हा जातीचा १२ कोटी रुपयांचा बादशहा रेडा व त्याचीच बहीण ३१ लिटर दूध देणारी बिजली ना नावाची म्हैस ही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
बादशहा रेडा हा ४ वर्षाचा आहे त्याचे वजन ११०० किलो असून सुखाचारा बाजरी, मका, ड्रायफ्रूट असे एक वेळ तो खाद्य खातो त्याचा रोजचा खर्च चार ते पाच हजार रुपये आहे. सकाळी तो फिरतो दूध पिऊन झोपतो दुपारीही विश्रांती घेतो.आणखी फिरून येतो व सायंकाळी पाच वाजता तो खाद्य खाऊन विश्रांती घेतो.
बजरंगी म्हैस ही ५ वर्षांची आहे ही बादशहाचीच बहीण असून तिचा खर्चही चार ते पाच हजार रुपये आहे ती रोज ३१ लिटर दूध देते तिचे खाद्यही चारा, मका, नाचणी असे आहे. या दोघांनाही नऊ माणसे सांभाळतात त्यांची नावे कोच देवेंद्र, संदीप, लोकेश, श्रीकृष्णन, प्रदीप चौधरी अशी आहेत.या दोन्ही जनावरांचे आई-वडील अजूनही जिवंत असून वडील बजरंगी हे आठ वर्षाचे असून आई लीलावती ही सात वर्षांची आहे.बादशहा व बिजली यांना २ भाऊ व ४ बहिणी आहेत.याबरोबरच या भीमा कृषी प्रदर्शनात कडकनाथ कोंबड्या, गायी, बैल, म्हैशी, चिनी कोंबड्या घोडे व अन्य जनावरे पहावयास मिळणार आहेत.
या प्रदर्शनात उद्या २७ जानेवारीस कृषी विभागाच्या कृषी विकासात्मक शासकीय योजना या विषयावर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री जालिंदर पांगारे मार्गदर्शन करणार आहेत.तर दुधाळ जनावरांसाठी मुरघास फायदेशीर या विषयावर चितळे डेरी फार्म भिलवडीचे चंद्रशेखर कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. तर विभागीय संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूरचे डॉ. एम.एम. यादव व डॉ.अस्वले हेदुधाळ जनावरांच्या आरोग्य व वासरू संगोपन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.ही व्याख्याने सकाळी १२ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहेत.
Comments
Post a Comment