कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश






देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, समाजहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे : श्री.राजेश क्षीरसागर




कोल्हापूर दि.२८ सिटी न्यूज नेटवर्क 

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार, समाज कार्याचा वसा पुढे घेवून जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यास युवक रससावत आहेत. सामील होणाऱ्या युवकांनी शिवसेनेचा इतिहास, त्याग समजावून घेवून शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र जपावा. गोरगरीब नागरिक, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, व्यावसायिक, कामगार अशा सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे करत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेवून समाजहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गड मुडशिंगी गावातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचा विजय असो" अशा घोषणा देण्यात आल्या.


            यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेना स्थापनेमागे मोठा इतिहास आहे. राज्यासाठी शिवसेनेचे योगदान बहुमुल्य आहे. आताच्या घडीला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेपासून मी शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, युवकांना न्याय देण्याचे काम केले. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत प्रश्नासाठी आंदोलने उभी केली आणि प्रश्न मार्गी लावले. हजारो विद्यार्थ्यांना विनाडोनेशन प्रवेश मिळवून दिले. यासह टोल, एल.बी.टी यासारखे राज्यव्यापी प्रश्नही हाती घेवून मार्गी लावले. पदाची कोणतीही अपेक्षा न करता सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या कामामुळेच शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद लाभले आणि जनतेने आमदार केले.

 देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. निती आयोगाच्या माध्यमातून देशाचे सकल उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्याच धर्तीवर राज्यात मित्रा या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रा संस्थेच्या माध्यमातून राज्याचा जीडीपी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातून देशाला महासत्ता बनविण्याच्या कार्यास बळकटी देण्यात येत आहे. युवा वर्ग देशाची संपत्ती असून, युवकांनी सक्षम व्हावे, असेही त्यांनी सांगितले.


.............................


दक्षिण मधील युवकांचा यापूर्वी राजकारणासाठीच वापर केला गेला : श्री.क्षीरसागर


कोल्हापूर उत्तर प्रमाणे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेनेही शिवसेनेला जनआधार दिला आहे. परंतु, या काही वर्षात दक्षिण मधील युवकांचा चुकीच्या मार्गाने फक्त राजकारणासाठीच वापर केला गेला. निवडणुकीस सामोरे जाताना युवकांसाठीचे व्हिजन फक्त जाहीरनाम्यावरच मर्यादित राहिले. त्यामुळे दक्षिण मधील अनेक युवक रोजगारासारख्या समस्यांचा सामना करत आहेत. त्याऐवजी युवकांना घडविणे. शिक्षण, रोजगार आदी माध्यमातून युवकांना सक्षम करणे हे शिवसेनेचे उद्दिष्ठ असल्याचे सांगितले.

*******************


मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि श्री.राजेश क्षीरसागर यांच्या कार्याने प्रेरित झाल्यानेच शिवसेनेत प्रवेश : रोहन सूर्यवंशी


राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यात विविध योजनांचा धडाका लावला आहे. कष्टकरी जनतेपासून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनाच लोकांच्या घरी आल्या. त्याचप्रमाणे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांनी गेल्या काही वर्षात कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोट्यावधीचां विकास निधी आणला आहेच. पण, जनतेच्या दैनंदिन प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांची ओळख आहे. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि श्री.राजेश क्षीरसागर यांच्या कार्याने प्रेरित झाल्यानेच शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे, युवा कार्यकर्ते रोहन सूर्यवंशी यांनी सांगितले.      


            यावेळी दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, युवा कार्यकर्ते रोहन सूर्यवंशी, रणवीर पाटील, सुरज पाटील, कुणाल पाटील, अक्षय शिंदे, शुभम कोळी, करण पाटील, आकाश माळी, गिरीश सावर्डेकर, पृथ्वीराज येडेकर, दीपक कोगे, अजय दांगट, राहुल पुजारी, कार्तिक बर्गे, उत्तम निगडे, अविनाश दड्डीकर, अनिकेत दांगट, गणेश मगदूम, राजदीप माळी, अमन पठाण आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 



Comments