पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भव्य अशा "भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची लोटली गर्दी

 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भव्य अशा "भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची  लोटली गर्दी



जगातील सर्वात मोठा हरियाणातील  १० कोटीचा गोलू टू रेडा, अडीच फूट उंचीची पुंगनुर गाय,१०० किलो वजनाचा वैताळ बिटल (मेल),फायटर कोंबडा,९५ किलोचा दीड वर्षाचा बिटल बकरा,७० किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसाचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस खास आकर्षण,शंकेस्वरी दीड फूट लाल मिरची खास आकर्षण



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

 शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी उपयुक्त माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२४ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अलोट गर्दी ही मेरी वेदर मैदानावर केली होती.प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून राष्ट्रपती पदक मिळविलेला,अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पानिपत येथील हरियाणा चॅम्पियन  गोलू टू रेडा जगातील सर्वात मोठा हरियाणातील  १० कोटीचा गोलू २ रेडा, अडीच फूट उंचीची गाय,१०० किलो वजनाचा वैताळ बिटल (मेल),फायटर  कोंबडा,वाशी येथील ९५ किलोचा दीड वर्षाचा बिटल बकरा,७० किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसाचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस खास आकर्षण पाहण्यासाठी  ठरत आहेत.मसाई पठार येथील सागर महाडिक यांच्या केदरलिंग गोशाळेतील सहा वर्षाचा कौंनक्रेज जातीचा सर्वसाधारण १२०० किलो लाडू नावाचा नंदी  हा आकर्षण ठरत आहे.

याचबरोबर गाय आणि बैल, पांढरा बैल, रावण नावाचा ६ फूट २ इंच लाल कंधारी वळू,नांदेड येथील बैल,साडेचार फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस खास आकर्षण ठरत आहेत.

याचबरोबर जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे पांढरे ससे,भीमा फार्म मधील ब्लॅक जॉक,सुलतान नावाचे घोडे,कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर,बर्ड,सेल,क्रोकोटल, पपेट,गिनिपिक चिनी कोंबड्या,बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,शंकेस्वरी दीड फूट लाल मिरची,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.देशी आणि विदेशी भाजीपाला ज्यात ढबू  मिरची उदगावची केळी, व्हनूर नांदणी येथील देशी केळी,मुळा,,भेंडी,वांगी, पपई,हिरवा व लाल कोबी,निशिगंध फुल,घट्ट गुलाब फुल लांब देठ असलेले गुलाब फुल,


यावर्षीचे प्रदर्शनाचे १५ वर्ष असून चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,गोपीनाथ मुंडे विमा योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी शेती करायची यासह कृषी विभागाच्या वतीने शेतीविषयक विविध मॉडेल प्रदर्शनात मांडलेले आहेत.याचबरोबर विहिरीचे मॉडेल ही मांडण्यात आले आहे.

आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर मोठी गर्दी केली आहे.

प्रदर्शनात आजरा घनसाळ, काळा तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम,  हळद आदी पहायला मिळत आहे. रेशीम कोष याची माहितीही  पहावयास मिळत आहे.

हायड्रोफोनिक चारा शिवाय चारा तयार करणारे मशीन  आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत.हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.व याची खरेदी शेतकरी वर्ग करत आहे.



मोफत झुणका भाकरीची सोय


भागीरथी महिला संस्थेमार्फत येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात आले विक्रम नगर येथील महालक्ष्मी महिला बचत गट यांनी ५००० भाकरी व झुणका वाटप करण्यात आल्या रोज प्रत्येक बचत गटांना संधी सौ अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.यावेळी मंगल ताई महाडिक साधना महाडिक मंगलताई महाडिक इंद्रजित जाधव प्रमोद हुदले आदी उपस्थित होते.


आज झालेल्या व्याख्यानांची माहिती


आज  पौष्टिक तृणधान्य पिके आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान या विषयावर नाचणी पैदास कार विभागीय संशोधन केंद्र कोल्हापूर डॉ. योगेश बन  यांनी मानवी आरोग्य बदललेले आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे हदयरोग,मधुमेह,पचनाचे आजार वाढत चालले आहेत यासाठी पौष्टीक भरडधान्य मधील नाचणी,वरी, कोडा, बार्टी,चीना,ज्वारी,बाजरी आदींचा आहारात समावेश करावा तरच निरोगी आरोग्य राहील असे सांगितले.या सर्वच भरडधान्यमध्ये कॅलशियम व प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले.

लंपी आजार व वांधतव व निवारण या विषयावर विकास अधिकारी कोल्हापूर डॉ. सँम लुद्रिक पशुधन  यांनी मार्गदर्शन करताना क्षारचूर्ण चे मिश्रण वयाप्रमाणे जनावरांना पोषक असतात त्यांना हे देणे आवश्यक आहे. लंम्पी आजरा हा व्हायरल विषाणूमुळे होतो.आणि हा आजार गावठी गायींना होतो मागील वर्षी याचे प्रमाण अधिक होते.असे सांगून सकस व वाळलेली वैरण देणे आवश्यक आहे असे सांगितले.हा लम्पी आजार माशा,चिलटे आणि डास यामुळे होतो.त्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.लिंब पाल्याचा धूर करणे आवश्यक आहे असे सांगितले.

तर पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फायदेशीर या विषयावर कृषी महाविद्यालय कोल्हापूचे  प्रा.अरुण मराठे यांनी मार्गदर्शन करताना


उद्या होणारी व्याख्याने


२८ जानेवारी रोजी उसाचे प्रसारित नवीन वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर दत्तात्रय थोरवे ऊस पिक संशोधक मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर डॉ. अरुण देशमुख प्रमुख नेराफिम प्रा. लिमिटेड पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.

आणि २९ जानेवारी रोजी जैविक खतांचा पूरक वापर फायदेशीर या विषयावर डॉ. रवी कानडे प्रा. कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे  मार्गदर्शन करणार आहेत.तर प्लॅस्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचे आधुनिक साधन या विषयावर व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत.ही सर्व व्याख्याने दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहेत.



सहभागी कंपन्या व उत्पादने


या प्रदर्शनामध्ये ऑरगॅनिक बायो फर्टीलायझर मध्ये युगांतर अँग्रो, वनिता अँग्रो,पॉवर टिलर आणि रोटावेटर मध्ये  डेक्कन फार्म इक्विपमेंट, पंप मध्ये बी.के.सेल्स,फ्लोटेक पंप सहभागी झाले आहेत.ट्रॅक्टर मध्ये ब याचबरोबर

कॅटल फीड मध्ये अमूल  पशू आहार व्हीर बॅक अँनिमल हेल्थकेअर.

सोलरमध्ये रकोर्ल्ड (कौशिक सोल्यूशन्स)श्री सद्गुरू सोलर,आदी.मिल्कमध्ये चितळे डेअरी, वारणा दुष संघ,गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आदी तर फूड मध्ये अँपीज इंडिया लिमिटेड.सवई मसाले (पीकेएम फूड) वाटण कंपनी जीजाई मसाले, आवजारांमधे विजय कृषी अवजारे,श्री महालक्ष्मी शेती अवजारे विभाग, पॉप्युलर इम्प्लिमेंट इरिगेशनमध्ये पूर्वा केमटेक प्रा.ली,जलधारा ड्रीप इरिगेशन, नेटा फिम इरिगेशन,शेतकरी ड्रिप इरिगेशन याशिवाय  बळीराजा आटा चक्की यांचे बळीराजा वॉटर फ्युरिफायर हे नवीन पेटंट मार्केट मधे येत आहेत. आदी कंपन्यांचा समावेश आहे.आणि त्यांची उत्पादने पाहावयास मिळत आहेत.



आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी  आदि नमुनांचे तांदूळ असणार आहेत. तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद विक्रीसाठी असणार आहेत.पाणबोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, पहावयास मिळत आहेt.


तसेच भाजीपाला, ऊस, बी - बियाणे पाहाव्यास मिळत आहेत. प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे ससे तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती  पहावयास मिळत आहेत. 


गोलू टू ची माहिती



पानिपत येथील हरियाणा चॅम्पियन गोलू टू हा राष्ट्रपती पदक रेडा प्रदर्शनात खास आकर्षण ठरत असून तो १६००किलो वजनाचा आहे,आणि त्याचे वय ५ वर्षे आहे.१४फूट लांब आणि ६ फूट उंच आहे.हा मुऱ्हा जातीचा असून तो अनेक म्हैशी आणि रेड्याचा बाप आहे त्याचे मालक नरेंद्र सिंग यांच्यासह १० जन त्याच्यासाठी कार्यरत दररोज असतात.


अडीच फूट उंचीची पुंगनुर गाय माहिती


मिरज येथील ऑल इंडिया चॅम्पियन अडीच फूट उंच व तीन वर्षे वयाची असलेली पुंगनुर गाय दररोज ५ लिटर दूध देते,या गायीच्या दुधाचा अभिषेक हा तिरुपती बालाजी देवास घातला जातो,या गायीचे दुध हे ५०० लिटरने विकले जाते.


बिटल बकऱ्याची माहिती


वाशी येथील विठ्ठल पुजारी यांचा लांब कान असलेला बिटल बकरा ९५ किलो वजनाचा असून तो दीड वर्षाचा असून तो गहू, मका,शेंग पेंड खातो.

वैताळ (मेल) बिटल  बांबरवाडी पन्हाळा येथील असून तो १९ महिन्याचा आहे त्याचे वजन १०० किलो आहे.

तर कोहिनूर बकरा हा १ वर्षे २६ दिवसांचा असून तो ७० किलो वजनाचा दोन दात असलेला आहे.


आज दिले जाणारे पुरस्कार


आज २८ रोजी दुपारी चार वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे ज्यात जिजामाता पुरस्कार - २,शेतिभूषण पुरस्कार - ५,आदर्श शेतकरी पुरस्कार - ८,आदर्श कृषी विस्तारक - ६,कृषी संशोधक -३ आणि पशु संवर्धन - ७ पुरस्कार दिले जाणार आहेत. आज सायंकाळी शोध लोककलेचा वारसा कलावंतांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.उद्या २९ रोजी बहारदार हिंदी,मराठी सुरेल गीतांचा कार्यक्रम ' सफर गीतांचा ' कार्यक्रम होणार आहे.


आज प्रदर्शनास खासदार धनंजय महाडिक,सौ अरुंधती महाडिक, माजी नगरसेवक ईश्वर परमार, कृष्णराज महाडिक,आई शकुंतला महाडिक,मंगलताई महाडिक,साधना महाडिक,पृथ्वीराज महाडिक यांनी भेट दिली.

प्रदर्शनाचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे मुख्य प्रायोजक आहेत. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग  महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

या प्रदर्शनासाठी सत्याजित  भोसले,प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,किरण रणदिवे आदींसह हाऊस ऑफ इव्हेंट चे सुजित चव्हाण यांची टीम कार्यरत  आहेत.

Comments