पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य भीमा कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी १२ कोटींची उलाढाल, आजरा घणसाळ तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री

 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य भीमा कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी  १२ कोटींची उलाढाल, आजरा घणसाळ तांदळासह अन्य धान्याची  उच्चांकी विक्री



 तिन दिवसात गर्दीचा  अक्षरशः महापूर , प्रदर्शन स्थळी लोटला जनसागर*ग्राहक आणि शेतकऱ्यांची  तोबा गर्दी*


आज शेवटचा दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंत्री ना.अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ना. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार समारोप*




कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला तीन दिवसात १० हजार  शेतकरी व नागरीकांनी  भेट दिली.  शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन,  खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.आज तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती.  त्यामुळे  मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी झाली होती. तीन दिवसात  तांदळाची उंच्चांकी विक्री  झाली  महिलां बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून  ५० लाखांची उलाढाल  झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.  भिमा कृषी प्रदर्शनात तीन दिवसात  तब्बल ६ कोटीची उलाढाल  झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी  झाली आहेत.


शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी गेली १५ वर्षांपासून  या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.तीन दिवसात कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण  भागातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे

भीमा कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित  ४०० कंपन्याचा सहभाग होता. २०० महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.


खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेले भीमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.आम्हाला वेगवेगळी जनावरे लहान मुलांना दाखविता आली,तसेच गोलू  टू ला पाहून लहान मुले भारावून गेली अशा प्रतिक्रिया नागरिक v शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.



प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून राष्ट्रपती पदक मिळविलेला,अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पानिपत येथील हरियाणा चॅम्पियन  गोलू टू रेडा जगातील सर्वात मोठा हरियाणातील  १० कोटीचा गोलू २ रेडा, अडीच फूट उंचीची गाय,१०० किलो वजनाचा वैताळ बिटल (मेल),फायटर  कोंबडा,वाशी येथील ९५ किलोचा दीड वर्षाचा बिटल बकरा,७० किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसाचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस खास आकर्षण पाहण्यासाठी  ठरत आहेत.मसाई पठार येथील सागर महाडिक यांच्या केदरलिंग गोशाळेतील सहा वर्षाचा कौंनक्रेज जातीचा सर्वसाधारण १२०० किलो लाडू नावाचा नंदी  हा आकर्षण ठरत आहे.

याचबरोबर गाय आणि बैल, पांढरा बैल, रावण नावाचा ६ फूट २ इंच लाल कंधारी वळू,नांदेड येथील बैल,साडेचार फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस खास आकर्षण ठरत आहेत.

याचबरोबर जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे पांढरे ससे,भीमा फार्म मधील ब्लॅक जॉक,सुलतान नावाचा घोडे,कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर,बर्ड,सेल,क्रोकोटल, पपेट,गिनिपिक चिनी कोंबड्या,बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

याचबरोबर  देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,शंकेस्वरी दीड फूट लाल मिरची,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.देशी आणि विदेशी भाजीपाला ज्यात ढबू  मिरची उदगावची केळी, व्हनूर नांदणी येथील देशी केळी,मुळा,,भेंडी,वांगी, पपई,हिरवा व लाल कोबी,निशिगंध फुल,घट्ट गुलाब फुल लांब देठ असलेले गुलाब फुल,


 चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,गोपीनाथ मुंडे विमा योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी शेती करायची यासह कृषी विभागाच्या वतीने शेतीविषयक विविध मॉडेल प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत.याचबरोबर विहिरीचे मॉडेल ही मांडण्यात आले आहे.

आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड गर्दी केली आहे.

प्रदर्शनात आजरा घनसाळ, काळा तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम,  हळद आदी खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. रेशीम कोष याची माहितीही  पहावयास मिळत आहे. ड्रोनचा वापर करून शेती करण्याचे तंत्र,चारा तयार करणारे मशीन  आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत.हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.व याची खरेदी शेतकरी वर्ग  करत आहेत.



*मोफत झुणका भाकरीचे आजही केले वाटप*


भागीरथी महिला संस्थेमार्फत येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजही मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात आली. रोज प्रत्येक बचत गटांना संधी सौ अरुंधती महाडिक यांनी उपलब्ध करून दिली आहे.



*आज झालेली व्याख्याने*


आज  उसाचे प्रसारित नवीन वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऊस पिक संशोधक मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव  डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी मार्गदर्शन करताना ऊस आणि त्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती दिली.१९३६ पासून च्या ऊस जातींची माहिती सांगितली.जर एम एस १४०८२,कोएसएनके ०५१०३ आणि कोसी ६७१ या वाणाची लागवड करावी असेही सांगितले.

आणि ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर नेराफिम प्रा. लिमिटेड पुणेचे प्रमुख  डॉ. अरुण देशमुख  यांनी मार्गदर्शन करताना ऊस महत्वाचे पिक आहे.ग्रामीण भागांचा चेहरा बदलण्याचे काम ऊस पिकाने केले आहे.कोल्हापूर भागातील जमिनी व शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली तर चांगली आहे.५५ ते ५८ लाख क्षेत्र उसाचे आहे.उत्पादकता पाहिले तर एकरी ३०ते ३५ आहे.खर्च वाढत आहे मात्र उत्पादन कमी असल्याचे सांगितले.

सांगितले. शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी वक्त्यांचे स्वागत प्रा. जे.पी.पाटील यांनी केले.



*उद्या २९ जानेवारी रोजी  होणारी व्याख्याने*


उद्या २९ जानेवारी रोजी जैविक खतांचा पूरक वापर फायदेशीर या विषयावर डॉ. रवी कानडे प्रा. कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे  मार्गदर्शन करणार आहेत.तर प्लॅस्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचे आधुनिक साधन या विषयावर व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत.ही सर्व व्याख्याने दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहेत.



कृषी विभागाच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे. शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ,गूळ,मध महोत्सव हेही आकर्षण ठरत आहे. तांदुळमध्ये  आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी  आदि नमुनांचे तांदूळ  बाजरी नाचणी सेंदिय हळद खरेदी केली जात आहे. पाणबोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, पहावयास मिळत आहेत.तसेच भाजीपाला, ऊस, बी - बियाणे पाहाव्यास मिळत आहेत. प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे ससे तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती  पहावयास मिळत आहेत. 




*आज २९ रोजी दुपारी १ वाजता होणार समारोप*


तर आज २९ रोजी दुपारी १ होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ना.अजित पवार  आणि ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थित होणार आहे.यावेळी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ना. श्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार व संसदीय कार्यमंत्री श्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री भरमू पाटील,  पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार ना.श्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री छत्रपती शाहू ग्रुप चेअरमन श्री राजे समरजीत सिंह घाटगे, महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक,खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती असणार आहे.


भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात  तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल : 


१) सेंद्रीय गूळ : २००० kg

२) इंद्रायणी तांदूळ : ३००० kg 

३) आजरा घनसाळ : ५००० kg 

४)रत्नागिरी २४ तांदूळ :- २५०० kg

५)दप्तरी तांदूळ    :- १५०० kg

६) सेंद्रीय हळद : ५०० kg 

७) जोंधळा जिरगा तांदूळ : १२०० kg 

८) नाचणी व नाचणी पदार्थ : ७००० kg

९)जंगल मध :- ५०० kg

१०)करवंद सरबत :- ५०० लिटर

११)काकवी :- ३०० लिटर

१२)बेदाणे :- ५०० kg

१३)केळी :- ७५० kg


आज रोजी बहारदार हिंदी,मराठी सुरेल गीतांचा कार्यक्रम ' सफर गीतांचा ' कार्यक्रम झाला.

Comments