दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५






माघ कृष्ण षष्ठी/सप्तमी. उत्तरायण, शके १९४६. संवत २०८१. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे" *छत्रपती शिवाजी महाराज जयंती* 


चंद्रनक्षत्र - स्वाती/ (सकाळी १०.४० नंतर) विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  तुळ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी आणि शनिशी शुभ योग आहे तर हर्षलशी प्रतियोग आहे. धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळतील. कोर्टात यश प्राप्ती होईल. शत्रू पराभूत होतील. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. कठोर बोलणे होईल. कामात काही बदल घडतील. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. अध्यात्मिक लाभ होतील. सत्संग घडेल. अधिकाराचा योग्य वापर कराल. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील. विहीर खणण्यास चांगला दिवस आहे.(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

    

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. शत्रू त्रास कमी होईल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील.  (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)मौल्यवान खरेदी कराल. वरिष्ठ खुश होतील.   


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. स्वप्ने साकार होतील. मात्र विनाकारण वाद घालू नका. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. खर्चात वाढ संभवते. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जोरदार प्रगती होईल. नात्यातून लाभ होतील.(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. खर्च वाढतील.(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज कमी जाणवेल. प्रिय व्यक्तीकडून लाभ होतील.  (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक)


 - सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


 १९ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुम्हाला तुमच्या कार्याला मर्यादा आलेल्या आवडत नाहीत. कोणताही विषय तुम्हाला वर्ज्य नाही. तुम्ही इतरांना विश्वासु वाटतात. तुमचे व्यक्तिमत्व धाडसी आणि पराक्रमी आहे. मोठ मोठे निबंध किंवा शोधप्रबंध तसेच उच्च शिक्षण यात तुम्हाला गती असते. तुम्ही अतिशय कमी वेळात योग्य निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला क्रीडा, व्यायाम, प्रवास, वाचन आणि लेखन याची आवड असते. तुमचा स्वभाव काहीसा उतावळा आहे आणी स्वतंत्र आहे. तुम्ही उत्तम लेखक होऊ शकतात आणि विशेष करून आर्थिक किंवा सामाजिक बाबींवर चे लिखाण प्रसिद्ध होते. तुमचा जन्म चांगल्या सुशिक्षित घरांमध्ये होतो. बालपणीच तुम्हाला अनेक सुखसोयी प्राप्त होतात. आयुष्यात तुम्ही मोठ्या पदावर पोहोचतात आणि उत्तम नावलौकिक आणि आर्थिक यश कमावतात. तुम्ही सतत कार्यमग्न असले तरच तुमचा उत्साह टिकतो.


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments