शिवाई ग्रुपच्या वतीने ५१ बाल मावळ्यांनी पारंपारिक वेशभुषेत "शिववंदना" केली सादर

शिवाई ग्रुपच्या वतीने ५१ बाल मावळ्यांनी पारंपारिक वेशभुषेत "शिववंदना" केली सादर 



कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठ येथील शिवाई ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवजन्मकाळानंतर सौ. यशश्री किशोर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ बाल मावळ्यांनी पारंपारिक वेशभुषेत "शिववंदना" सादर केली. यावेळी हर्षवर्धन घाटगे याने बालशिवाजी महाराज तर कृष्णाली ओतारी हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभुषा साकारली. 

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडीक, माजी खासदार संजय मंडलिक, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, किशोर घाटगे, रमेश पोवार, आदिल फरास, मारुतराव कातवरे, अशोक भंडारे, अनिल घाटगे व मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे आदी उपस्थित होते. तर वैभवी घाटगे, प्रांजल पाटील, केतकी साळोखे, आहना मुल्ला, आयुष्का उरुणकर, साम्रादणी कुंभार, शर्मीष्ठा घाटगे, स्वानंदी घाटगे, शिवतेज घाटगे, विरांत घाटगे, नरेश बुचडे, देवांश बुचडे, शर्विल पाटील, विहान सावंत, अर्णव सावंत, आदिल प्रभावळे, वरद घाटगे, चिन्मय प्रभावळे, वेदांत पोवार, जैन हबीब आदींनी यामध्ये बालमावळे म्हणून सहभाग नोंदवला.

Comments