दैनिक राशिभविष्य
गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५.
माघ कृष्ण सप्तमी/अष्टमी. क्रोधी नाम संवत्सर. शके १९४६. संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र - विशाखा/(दुपारी १.३० नंतर) अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
"आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे." *काळाष्टमी*
मेष:- चंद्राचा रवीशी केंद्र योग तर नेपच्युनशी त्रिकोण योग आहे. संमिश्र दिवस आहे. व्यापार वाढेल. सरकारी कामात प्रगती होईल. प्रतिष्ठा प्राप्त होईल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. संभ्रम दूर होतील. मार्ग सापडेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. व्यवसाय वाढतील. विनाकारण वाद होऊ शकतात.
कर्क:- लहान प्रवास घडतील. जलपर्यटन घडेल. मित्र मंडळी भेटतील. नवीन ओळखी होतील. आरोग्य सांभाळावी लागेल. नैतिकता सोडू नका.
सिंह:- घरगुती काम करताना काळजी घ्या. बोलताना काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे.
कन्या:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नातेवाईकांमुळे लाभ होईल. नोकरीत त्रास होऊ शकतो.
तुळ:- कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक:- कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. दुपारनंतर फरक पडेल. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात.
मकर:- अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवातीला चांगले अनुभव येतील. संध्याकाळ नंतर काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल.
कुंभ:- दशम स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. अधिकार वढतील. प्रतिष्ठा मिळेल. दबदबा वाढेल.
मीन:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सला मोलाचा ठरेल. सरकारी कामात वाद होऊ शकतात.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment