परीक्षा नव्हे तर जीवनातील प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने सामोरे जा - विजयसिंह भोसले यांचे आदर्श प्रशालेत विद्यार्थ्यांशी हितगुज

 परीक्षा नव्हे तर जीवनातील प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने सामोरे जा  - विजयसिंह भोसले यांचे आदर्श प्रशालेत विद्यार्थ्यांशी हितगुज    







     कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसदिच्छा समारंभ संपन्न झाला .प्रांरभी प्रमुख अतिथींच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून घालण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक आर वाय पाटील यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय  आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांनी करून दिला . इयत्ता आठवी व नववीच्या वर्ग प्रतिनिधीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . संचिता मोरबाळे, जान्हवी पाटील, समर्थ अलुगडे आणि अभय बुरंगे या विद्यार्थ्यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपल्या भाषणातून अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची स्वभाव वैशिष्ट्ये व अध्यापन पद्धती याबाबत प्रतिपादन केले.  एस एस शिंदे यांनी प्रशालेचा कार्य अहवाल सादर केला . प्रमुख अतिथी वक्ते विजयसिंह भोसले यांनी विद्यार्थ्यांना विनोदी शैलीने प्रभावी असे मार्गदर्शन केले.



चांगल्या सवयी अंगीकारणे, आत्तापासूनच नीट सह विविध परीक्षांसाठी योग्य अशी मेहनत घेणे तसेच सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्व जाणून घेऊन त्यांचा आदर करावा असे मौलिक मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले . दहावीच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. .सुतार यांनी केले तर आभार ए के  देसाई यांनी मानले .

Comments