दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५.





 माघ कृष्ण अष्टमी/नवमी. शके १९४६. संवत २०८१. उत्तरायण. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे" 


नक्षत्र - अनुराधा/ ज्येष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (व्यघात योग शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. चंद्राचा शुक्राशी त्रिकोण योग, बुध आणि गुरूशी अशुभ योग् आहे. धनप्राप्ती होईल.  चैनीवर खर्च कराल. नैतिकतेने वागणे हिताचे आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींशी वाद टाळा.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. भौतिक सुखे प्राप्त होतील.




मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. गृह सजावट होईल. जमीन व्यवहारात यश मिळेल. वस्त्र खरेदी होईल.

 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील. चांगली बातमी समजेल. दागिने घडतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षमता वाढतील. नेतृत्व कराल. गायकांना उत्तम दिवस आहे. मेजवानी मिळेल.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक आवक वाढेल.  व्यापार वाढेल. नात्यातून लाभ होतील. मन आनंदी करणारा दिवस आहे.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काही सुखद अनुभव येतील. मोठी जोखीम घेऊ नका. गुंतवणूक टाळा. कर्जे घेऊ नका. खर्च वाढतील.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रथम चंद्र आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. खरेदी होईल. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रवास घडतील. धाडस दाखवाल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. स्वप्ने साकार होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. कलाकारांना यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. सामाजिक कामातून नवीन ओळखी होतील.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण करा. अर्थलाभ होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीसाठी वेळ द्याल.


- सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


२१ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


      तुमच्यावर गुरू, शनी आणि चंद्राचा प्रभाव आहे. तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती आहात. आयुष्याच्या शेवटी तुम्हाला प्रसिद्धी आणि मान मिळतो. स्वभाव उत्साही असून प्रवासाची आवड असते. मन अस्थिर आणि चंचल आहे. झोप सावध असते. तुमचे विचार तुम्ही ताबडतोब कृतीत आणतात. स्वभाव चांगला मात्र वृत्ती संशयी असते. पशू, पक्षी, झाडे, फुले यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही गर्दी मध्ये रमतात असे इतरांना दाखवतात मात्र मनातून तुम्ही एकाकी असतात. तुम्ही अत्यंत संवेदनशील आहात आणि काहीसे भित्रे देखील असतात. मात्र समाजात वावरताना तुम्ही धाडसी आणि पराक्रमी असल्याचे दाखवतात. त्यामुळे तुमच्या मनावर ताण येऊन एकाग्रता कमी होते. इतरांचा द्वेष किंवा मत्सर करणे तुम्हाला आवडत नाही. इतरांच्या मागे त्यांच्याबद्दल वाईट बोलणे याची तुम्हाला चीड आहे. तुम्ही इतरांकरता स्वार्थत्याग करतात. जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमची वृत्ती असते. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल तुम्हाला अधिक आकर्षण असते. तुमचा स्वभाव शांत आणि नम्र असला तरीही विनाकारण इतरांच्या कटकारस्थानात तुम्ही बळी पडतात. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असतो. ती गोष्ट किंवा बाब कशी आहे यापेक्षा कशी असायला पाहिजे यावर तुमचा जास्त भर असतो.


शुभ दिवस: मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग: पिवळा, जांभळा, हिरवा.


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments