कैम्पा असणार आयपीएल चा ‘को-पावर्ड स्पॉन्सर’, जिओस्टारसोबत भागीदारी

 कैम्पा असणार आयपीएल चा ‘को-पावर्ड स्पॉन्सर’, 

जिओस्टारसोबत भागीदारी



• रिलायन्सचा नवा एनर्जी ड्रिंक ‘स्पिनर’ देखील आयपीएल मध्ये झळकणार


कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) च्या कैम्पा ब्रँडने जिओस्टारसोबत भागीदारी केली आहे. IPL 2025 मध्ये कैम्पा हा टीव्ही आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी ‘को-पावर्ड स्पॉन्सर’ असेल. विशेष म्हणजे, देशातील सर्वाधिक पाहिले जाणारे स्पोर्ट्स इव्हेंट IPL यंदा जिओस्टारवर प्रसारित होणार आहे. या भागीदारीमध्ये स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या प्रादेशिक भाषांमधील प्रसारणाचाही समावेश आहे, ज्यामुळे कैम्पा ब्रँडचा पोहोच आणखी वाढेल.



रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे COO केतन मोदी म्हणाले,

“IPL साठी जिओस्टारसोबत भागीदारी करून आम्ही क्रिकेटप्रती आमची बांधिलकी दाखवतो. टीव्ही आणि डिजिटलवर ‘को-पावर्ड स्पॉन्सरशिप’ मिळवून, आम्ही भारतातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर आमची उपस्थिती वाढवत आहोत. या सहकार्यामुळे कैम्पा ब्रँडचा पोहोच वाढेल आणि लाखो क्रिकेटप्रेमींशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल.”



जिओस्टारचे बिझनेस हेड, स्पोर्ट्स रेव्हेन्यू, ईशान चटर्जी म्हणाले,

“आयपीएल साठी प्रमुख प्रायोजक म्हणून कैम्पा ला आमच्यात सामील करून घेताना आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीमुळे देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान आमच्या संयुक्त बांधिलकीला अधिक बळ मिळेल. जिओस्टारच्या अफाट पोहोच आणि कैम्पाच्या पेय पदार्थ क्षेत्रातील मजबूत पकडीमुळे आम्ही भारतातील लाखो चाहत्यांना एकत्र आणू.”



गेल्या दोन वर्षांत BCCI आणि आयपीएल मधील अनेक संघांसोबत भागीदारी करत कैम्पाने आधीच क्रिकेट इकोसिस्टममध्ये आपली पक्की जागा निर्माण केली आहे. या नव्या सहकार्यामुळे ही उपस्थिती आणखी मजबूत होईल. टाटा आयपीएल 2025 हंगामात रास्किक ग्लूको एनर्जी आणि स्पोर्ट्स ड्रिंक स्पिनर यांचीही सुरुवात होणार आहे, ज्यामुळे ब्रँडची लोकप्रियता वाढेल आणि ग्राहकांशी संबंध अधिक घट्ट होतील.

Comments