आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MHT-CET केले सुरू
नवीन MHT-CET अभ्यासक्रमांची सुरूवात ही प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाशच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), जी टेस्ट प्रिपरेटरी सेवांची राष्ट्रीय अग्रणी संस्था आहे, त्यांनी महाराष्ट्रातील 10वी आणि 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET (सामान्य प्रवेश परीक्षा) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या प्रादेशिक प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या वर्गांना बोर्ड परीक्षेनंतर सुरुवात होईल.
नवीन MHT-CET अभ्यासक्रम आकाशच्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच CBSE अभ्यासक्रमासाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आपल्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण समाधान प्रदान करेल.
यासाठी इयत्ता ११ वीच्या स्वतंत्र बॅचेस तयार केल्या जातील आणि अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असेल.
MHT-CET मध्ये २०२२ मध्ये ६,०६,७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,६७,३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २०२३ मध्ये ६,३६,८०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ५,९१,१३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २०२४ मध्ये ७,२५,७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या नवीन उपक्रमाच्या काही वैशिष्ट्ये:
• इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातील.
• MHT-CET अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विस्तृत अभ्यासक्रम तयार केला जाईल.
• इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या विषयांसह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) उच्च-स्तरीय अध्ययन सामग्री पुरवली जाईल.
• आकाशद्वारे तयार केलेले अत्यंत आकर्षक परीक्षापत्र.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख, डॉ. एच. आर. राव म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना उच्च-स्तरीय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात CET अभ्यासक्रम सुरू करून, आम्ही राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना भक्कम शैक्षणिक पाया प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ते MHT-CET मध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. आमचे उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना राज्यातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यास मदत करणे.”
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) बद्दल
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ही भारतातील आघाडीची परीक्षा तयारी संस्था आहे, जी वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) तसेच स्पर्धात्मक परीक्षा (NTSE, ऑलिम्पियाड्स) यांसाठी व्यापक आणि प्रभावी तयारी सेवा पुरवते.
AESL ही संपूर्ण भारतभर ३१५ हून अधिक केंद्रांचे नेटवर्क असलेली संस्था आहे, ज्यात ४,००,०००+ विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत. गेल्या ३६ वर्षांमध्ये संस्थेने आपली भक्कम बाजारपेठ निर्माण केली आहे आणि उच्च गुणवत्तेच्या परीक्षेच्या तयारीसाठी वचनबद्ध आहे.
AESL विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेते. त्यांची प्रशिक्षक टीम अत्यंत अनुभवी असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. कंपनीच्या अभ्यासक्रमात लवचिकता असून अध्यापन तंत्रज्ञानाच्या आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे, जेणेकरून विद्यार्थी परीक्षांसाठी उत्तम प्रकारे तयार होऊ शकतील.
Comments
Post a Comment